चऱ्होलीत विवाहितेच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न

111

भोसरी, दि. १४ (पीसीबी) – घरात कोणी नसल्याचा फायदा घेत एका इसमाने ३७ वर्षीय विवाहितेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बाचावासाठी आलेल्या तिच्या मुलावर आणि विवाहितेवर कटरने वार केले. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि.१३) दुपारी बाराच्या सुमारास चऱ्होली येथे घडली.

याप्रकरणी विवाहितेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शिवराम तुकाराम मगर (वय ४८, रा. रा. फ्लॅट क्र.१३, तिसरा मजला, आकांक्षा बिल्डींग, आळंदी) या इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित ३७ वर्षीय महिला या बुधवारी दुपारी त्यांच्या चऱ्होली येथील घरात एकट्याच होत्या. यावेळी आरोपी शिवराम हा जबरदस्ती त्यांच्या घरात घुसले आणि तु मला आवडतेस असे म्हणुन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पिडितेने त्याचा विरोध करत आरओरड सुरु केली. यावर शिवरामने तिला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यादरम्यान पिडितेचा मुलगा घरी आला असता आरोपी शिवरामने मुलावर आणि पिडितेवर कटरने वार केले आणि पसार झाला. पोलिसांनी शिवराम याला अटक केली आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक सागर तपास करत आहेत.