चऱ्होलीत अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; आरोपी फरार

18

चऱ्होली येथे एका दहा वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना  मंगळवारी (दि. १०)  चऱ्होली गावात घडली.

भारत सुरवसे (वय २८, रा. लोहारा, उस्मानाबाद) असे लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अत्याचार पिडीत मुलाच्या आईने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. १०)   आरोपी भारत सुरवसे याने चऱ्होली येथे राहणाऱ्या एका दहा वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केला. घडलेला सर्व प्रकार मुलाने घरच्यांना सांगितला. त्यानुसार मुलाच्या आईने बुधवारी (दि.११) मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी  भारत सुरवसे विरोधात दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.  आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नाही. दिघी पोलीस तपास करीत आहेत.