चऱ्होली येथील महापालिकेच्या शाळेसाठी सीएसआरच्या माध्यमातून खासगी कंपन्यांनी दिलेल्या ई-लर्निंग साहित्य व खेळाळाच्या साहित्यांचे महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुरूवारी (दि. ५) वाटप करण्यात आले.

जानकीदेवी बजाज एज्युकेशनल इनिसिएटिव्ह या संस्थेच्या वतीने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिब्लिटीच्या (सीएसआर) माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांना एलईडी टीव्ही, ई-लर्निंग साहित्य, क्रीडा साहित्याचे वाटपही महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेविका सुवर्णा बुर्डे, महिला बालकल्याण समितीच्या सभापती सुनिता तापकीर, शाळेचे मुख्याध्यापक नामदेव उथळे, जानकीदेवी बजाज संस्थेचे के. बी. वाळके, हेमांगी ठोनावाला, शाळा समन्वय समिती अध्यक्ष पांडुरंग पठारे, उपाध्यक्ष सुनिल तापकीर आदी उपस्थित होते.