चंद्राबाबू नायडूंना शरद पवार म्हणतात, निकालाआधी बैठक नको   

148

नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) –  लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या तीन दिवसांवर आला आहे.  विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या बैठका सुरु झाल्या आहेत. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगु देशम पक्षाचे अध्यक्ष चंद्रबाबू नायडू हे सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांची  गाठीभेट घेत आहेत. चंद्राबाबू नायडू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

या भेटीनंतर शरद पवार यांनी  निकालाआधी विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक होणार नाही. सगळेच नेते निकालाची वाट बघत आहेत. अनेक विरोधी पक्षाचे नेते निकालाआधी बैठकीसाठी येण्यास नकार देत आहेत. असे सांगून  नायडू यांच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे.

याआधी सोनिया गांधी यांनी देखील विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत फोनवर चर्चा केली. पण निकालाआधीच कोणतेच नेते बैठकीसाठी येण्यास तयार नसल्याचे चित्र  दिसत आहे.

शेवटच्या टप्प्यातील प्रचार संपताच चंद्रबाबू नायडू यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेण्याच सुरुवात केली. शुक्रवारी त्यांनी काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांच्यासोबतच माकप नेते सीताराम येच्युरी आणि आम आदमी पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली.