चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि साधू वासवानी मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने १ मार्च रोजी मोफत शिबीराचे आयोजन

210
चिंचवड, दि.२० (पीसीबी) – चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि साधू वासवानी मिशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांसाठी येत्या १ मार्च रोजी मोफत जयपूर फूट (कृत्रिम हातपाय) वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. 
१ मार्च रोजी पिंपळेगुरव येथील जगताप पाटील कॉम्प्लेक्समध्ये सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मोफत जयपूर फूट वाटप शिबीर होणार आहे. तसेच शिबीरात सहभागी होणाऱ्या दिव्यांगांची तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडून आरोग्य तपासणी केली जाणार आहे. अपघात, मधुमेह, रक्त वाहिन्यांचे आजार, गँगरीन, पोलिओग्रस्त व इतर कारणांमुळे पाय कापलेल्या रुग्णांना या शिबीरात मोफत जयपूर फूटचे वाटप केले जाणार आहे. या शिबीराचा पिंपरी-चिंचवड, पुणे जिल्ह्यांसह महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या गरजू दिव्यांगांनी लाभ घ्यावा. तसेच धडधाकट नागरिकांनी आपल्या आसपास राहणाऱ्या दिव्यांगांपर्यंत या शिबीराची माहिती पोहोचवावी आणि त्यांना मदत करून माणुसकी दाखवावी, असे आवाहन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे.
या शिबीरासाठी नाव नोंदणी करण्याची गरज नाही. नाव नोंदणी न करता शिबीरात सहभाग घेऊ शकता. असे आवाहन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे. पिंपरी-चिंचवड, पुणेसह महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या दिव्यांगांना या शिबीराचा लाभ घेता येणार असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले. त्यामुळे आपल्या समाजात धडधाकट असलेल्या नागरिकांनी आपल्या आसपास राहणाऱ्या दिव्यांगांपर्यंत या शिबीराची माहिती पोहोचवावी. अधिक माहितीसाठी 8208487723, 7507411111 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावे, असे आवाहनही आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे.