चंद्रकांत पाटील यांच्याविरोधातील अपक्ष उमेदवाराची माघार

0
428

पुणे, दि. ७ (पीसीबी) – कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविरूद्ध अपक्ष उमेदवारी अर्ज आशिष कुंटे यांनी दाखल केला होता. पण आज ( सोमवारी) त्यांनी माघार घेत पाटील यांना  पाठिंबा जाहीर केला आहे.

आशिष कांटे यांनी  भाजप- शिवसेना महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा जाहीर करत असल्याचे सांगितले. तसेच आशिष कांटे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

याबाबत  पाटील म्हणाले की,  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे अनेक तरुण भाजपात काम करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. आशिष कांटे यांनीही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे पक्षात स्वागत करत आहे.