चंद्रकांतदादा पदवीधर निवडणुकीत कोणामुळे निवडून आला? – खासदार उदयनराजे  

139

सातारा, दि. १४ (पीसीबी) – चंद्रकांतदादा आम्ही मनाने राजे आहोत. मी मनाने किती मोठा आहे, ते तुम्हाला ठाऊक आहे. पदवीधर निवडणुकीत आम्ही किती मदत केली होती. ते तुम्ही आठवा म्हणजे कोणामुळे निवडून आला ते कळेल. आता मला यावर अधिक काही बोलायचे नाही,  असा  टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी  मंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

खासदार उदयनराजे  यांनी विकास कामाचा निर्धारनामा  प्रसिद्ध केला.  त्याची माहिती देण्यासाठी आज (रविवार) पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

उदयनराजे म्हणाले की, पुढील पाच वर्षातील कामाचे नियोजन आम्ही केले आहे. नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. अनेक मोठी विकास कामे मार्गी लावली. यापुढे कमी पडणार नाही तसेच शेती, पाणी, आरोग्य, इंडस्ट्रीयल, शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाच वर्षात काम केले जाणार आहे.