घोरपडीत लष्करी जवानाची रेल्वेखाली आत्महत्या

161

पुणे, दि. २९ (पीसीबी) – आत्महत्या करणार असल्याची चिठ्ठी लिहून बेपत्ता झालेल्या लष्करी जवानाचा आज (रविवार) घोरपडी रेल्वेरुळा लगत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्याने धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती मुंढवा पोलिसांनी दिली आहे.

एस. रमेश (वय २८,  रा. घोरपडी) असे  मृत जवानाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रमेश यांनी बेपत्ता होण्यापूर्वी आपण आत्महत्या करणार असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यानुसार मुंढवा पोलीस ठाण्यात दोन दिवसापूर्वी तो बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र, आज (रविवार) रमेश यांचा घोरपडी रेल्वे रुळाजवळ मृतदेह सापडला. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजूशकलेले नाही. मुंढवा पोलिस तपास करत आहेत.