घातक शस्त्रे बाळगल्या प्रकरणी चौघांना अटक

83

चिंचवड, दि. १८ (पीसीबी) – घातक शस्त्रे बाळगल्या प्रकरणी निगडी पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 17) मध्यरात्री सव्वाएक वाजता दुर्गानगर, चिंचवड येथे करण्यात आली.

महेश सुरेश साळुंखे (वय 38), राहुल रामचंद्र दौंड (वय 30), बाबासाहेब हनुमंत गजरमल (वय 32, तिघे रा. अजंठानगर, चिंचवड), गोपाळ अंकुश हाळनोर (वय 25, रा. घरकुल, चिखली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक विलास केकाण यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्याद पोलीस नाईक विलास केकाण देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी त्यांना माहिती मिळाली की, दुर्गानगर चिंचवड येथील एका पत्र्याच्या चाळीच्या आडोशाला घातक शस्त्रे घेऊन थांबले आहेत. त्यानुसार निगडी पोलिसांनी सापळा लावून कारवाई केली.

चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून लोखंडी कोयता, रॉड, चॉपर अशी हत्यारे पोलिसांनी जप्त केली आहेत. चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक उत्तम ओमासे तपास करीत आहेत.