घाटकोपर बॉम्बस्फोटातील फरार आरोपीला औरंगाबादमधून अटक

71

औरंगाबाद, दि. ८ (पीसीबी) – २००२ मध्ये मुंबईतील घाटकोपर येथे झालेल्या बॉम्बस्फोटातील फरार आरोपीला औरंगाबादमधून अटक करण्यात आली आहे. मंगळवारी (दि.७) संध्याकाळी औरंगाबाद स्थानिक एटीएसच्या सहाय्याने गुजरात एटीएसने ही कारवाई केली.

अब्दुल रहमान शेख (वय ४३, रा. कैसर कॉलनी, औरंगाबाद) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी आरोपी अब्दुल शेख हा त्याच्या आजारी पत्नीला भेटण्यासाठी औरंगाबादमध्ये येणार असल्याची माहिती गुजरात एटीएसला मिळाली होती, त्यानुसार स्थानिक एटीएसच्या मदतीने सापळा रचून एका खासगी रुग्णालयातून त्याला ताब्यात घेण्यात आले. गुजरात एटीएसचे पथक त्याला मुंबई क्राईम ब्रँचच्या ताब्यात देणार आहेत. दरम्यान, तो २००२ पासून सौदीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.