घरासमोर टपरी लावण्यास विरोध केल्याने महिलेला मारहाण

19

चिंचवड स्टेशन, दि. १८ (पीसीबी) – महिलेच्या घरासमोर टपरी लावत असल्याने महिलेने विरोध केला. यावरून टपरी लावणा-या व्यक्तीने महिलेला आणि तिच्या मुलाला मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 17) दुपारी साडेतीन वाजता अजिंठानगर, चिंचवड येथे घडली.

विमल संजय निंबाळकर (वय 46, रा. अजिंठानगर, चिंचवड) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सत्यवान जाधव (वय 32, रा. अजिंठानगर, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सत्यवान फिर्यादी यांच्या घरासमोरील सार्वजनिक जागेवर टपरी लावत होता. त्यासाठी फिर्यादी यांनी आरोपीला विरोध केला. यावरून आरोपी आणि फिर्यादी यांच्यामध्ये भांडण सुरु झाले. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी यांचा मुलगा आला. आरोपीने त्याला शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. मुलाला मारण्यासाठी रंग मारण्याचा रोलर उगारला असता फिर्यादी मध्ये आल्या. त्यामुळे रोलर फिर्यादी यांना लागला आणि त्या जखमी झाल्या. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare