घराला कुलूप बघून चोरट्यांना भेटली सुवर्णसंधी आणि…

65

चिंचवड, दि. २५ (पीसीबी) – घराला कुलूप लावून गोव्याला गेलेल्या एका कुटुंबाच्या घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. घरातून 32 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 23) सकाळी सव्वा अकरा वाजता चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी येथे उघडकीस आली.

मेहबूब मयखतूनसाहब गुब्याड (वय 22, रा. मोरया हाउसिंग सोसायटी, चिंचवड) यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे भाऊ हाजीमलंग गुब्याड गोवा येथे गेले होते. 19 जुलै रोजी रात्री साडेदहा ते 23 जुलै रोजी सकाळी सव्वा अकरा वाजताच्या कालावधीत त्यांचे घर कुलूप लावून बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने घराचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटातून 23 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, नऊ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 32 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare