घराला कुलूप बघून चोरट्यांनी आखला प्लॅन पण…

63

चिखली, दि. २७ (पीसीबी) – शिवतेजनगर चिखली येथे घरफोडीचा प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून 58 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना रविवारी (दि. 25) दुपारी उघडकीस आली आहे. 

आशिष वामनराव राखेलकर (वय 32, रा. शिवतेजनगर, चिखली) यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आशिष राखेलकर 21 जुलै रोजी त्यांच्या घराला कुलूप लावून तुळजापूर येथे गेले होते. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातून सोन्याचे दागिने आणि 20 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 58 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. फिर्यादी आशिष 25 जुलै रोजी दुपारी एक वाजता घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare