घरात घुसून महिलेशी गैरवर्तन; एकास अटक

131

बोपखेल, दि. ३ (पीसीबी) – महिलेच्या घरात घुसून तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 30) मध्यरात्री दीड वाजता रामनगर बोपखेल येथे घडली.

अनिकेत जोगदंड (वय 28) याला अटक केली आहे. त्याच्यासह अविनाश जोगदंड (वय 36, दोघे रा. रामनगर, बोपखेल) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत महिलेने (वय 38) याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्री आरोपी दोघेजण फिर्यादी यांच्या घरात जबरदस्तीने आले. फिर्यादी यांनी आरोपींना घराबाहेर जाण्यास सांगितले असता आरोपी अनिकेत याने फिर्यादिसोबत गैरवर्तन केले. तसेच आरोपी अविनाश याने शिवीगाळ करून फिर्यादीचा विनयभंग केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.