घरात गुटखा साठवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळताच; घडलं असं काही

42

दिघी, दि. २६ (पीसीबी) – शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा साठवून ठेवल्याप्रकरणी दिघी पोलिसांनी रविवारी (दि. 25) कारवाई केली. त्यात तीन हजार 790 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

सुनील सोपान गोडसे (वय 40, रा. दिघी गावठाण) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस नाईक रमेश गायकवाड यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनील गोडसे याने दिघी गावठाण येथील सोपान गोडसे यांच्या घरात गुटखा साठवून ठेवल्याची माहिती दिघी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रविवारी कारवाई करत तीन हजार 790 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare