घरातून चार मोबाईल फोन चोरीला

61

थेरगाव, दि. ६ (पीसीबी) -घरातून अज्ञात चोरट्याने चार मोबाईल फोन चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 5) पहाटे चार ते सकाळी पावणे आठ वाजताच्या सुमारास डांगे चौक, थेरगाव येथे सुनेरा प्लाझा बिल्डिंग येथे घडली.

एम बाबर आलम (वय 31, रा. डांगे चौक, थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. घरातून फिर्यादी आणि त्यांच्या तीन मित्रांचे असे 28 हजार रुपये किमतीचे चार मोबाईल फोन चोरून नेले. पोलीस उपनिरीक्षक जगताप तपास करीत आहेत.

WhatsAppShare