घरभाडे मागितले म्हणून आई व मुलाला मारहाण

29

काळेवाडी, दि. २२ (पीसीबी) – घरात राहणा-या व्यक्तीला घरभाडे मागितले. त्यावरून घरात राहणा-या व्यक्तीने पैसे मागणा-या तरुणाला आणि त्याच्या आईला मारहाण केली. तसेच सिमेंटचा गट्टू डोक्यात मारून जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. 21) सकाळी साडेअकरा वाजता श्रीकृष्ण कॉलनी, पवारनगर, काळेवाडी येथे घडली.

नितीन शशिकांत माने (वय 19, रा. श्रीकृष्ण कॉलनी, पवारनगर, काळेवाडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी धर्मराज नामदेव गवई (वय 35) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नितीन आणि आरोपी धर्मराज एकत्र राहतात. त्यामुळे नितीन यांनी आरोपी धर्मराज याच्याकडे घरभाडे मागितले. त्यावरून ‘मी तुम्हाला व घरमालकाला भाड्याचे पैसे देणार नाही. तुम्हाला काय करायचे ते करा’ असे म्हटले. तसेच धर्मराज याने नितीन आणि त्यांच्या आईला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यानंतर नितीन यांच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून जखमी केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare