घरफोड्यांची लागली लॉटरी; तब्बल साडेतीन लाखांचे दागिने लंपास केलेच पण सोबतच…

59

देहूगाव, दि.२७ (पीसीबी) – देहूगाव येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सहा लाख 60 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 25) रात्री सात ते नऊ वाजता च्या कालावधीत घडली.

देविदास शिवाजी जाधव (वय 25, रा. विघ्नहर्ता सोसायटी, विठ्ठलनगर, देहूगाव) यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री सात ते नऊ वाजताच्या कालावधीत फिर्यादी यांचे घर कुलूप लावून बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. फिर्यादी आणि त्यांच्या आईच्या बेडरूममधील लाकडी कपाटातून 3 लाख 60 हजार रुपयांचे 12 तोळे सोन्याचे दागिने आणि तीन लाख रुपये रोख रक्कम असा एकूण सहा लाख 60 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare