घरगुती हिंसाचार प्रकरणाचा निकाल व्हॉट्स अॅपवर पाठवण्यावर कोर्टाचे शिक्कामोर्तब

110

दिल्ली, दि. ३ (पीसीबी) – घरगुती हिंसाचार प्रकरणात निकालाची प्रत व्हॉट्स अॅपवर पाठवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. एका विवाहीत महिलेच्या छळा प्रकरणी सुनावणी दरम्यान दिल्लीतील महिला कोर्टाने हा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात पत्नीचा छळ करणाऱ्या पतीला आणि त्याच्या नातेवाईकांना व्हॉट्स अॅपद्वारे निकाल पाठवा असे स्पष्ट करण्यात आले आहे.

एकीकडे व्हॉट्स अॅप किंवा इतर सोशल मीडियावर फिरणाऱ्या फेक मेसेजस मुळे त्यावर निर्बंध आणावेत अशी मागणी होते आहे. अशात कोर्टाने दिलेला हा निर्णय महत्त्वाचा आहे. तसेच कायदेशीर प्रक्रियेत सोशल अॅपचा वापर केल्याने या प्रक्रियेला वेग येईल असे दिसते आहे. देशाच्या न्याय व्यवस्थेतील हा बदल ऐतिहासिक आहे. इतकेच नाही तर दिल्लीतील न्यायव्यवस्थेतही पहिल्यांदाच असा निर्णय घेण्यात आला आहे.