घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला विश्वासघात

14

हिंजवडी, दि. २२ (पीसीबी) – घरकाम करणाऱ्या महिलेने घरातून सोन्याची चैन आणि रोख रक्कम असा एकूण तीन लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 20) सकाळी विनायक कॉलनी, मारुंजी येथे घडली.

मोनिका महेश वाघ (वय 27, रा. मारुंजी, ता. मुळशी) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ललिता राठोड या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ललिता राठोड ही महिला फिर्यादी मोनिका वाघ यांच्या घरी घरकाम करत होती. मंगळवारी सकाळी साडेदहा ते अकरा वाजताच्या सुमारास आरोपी महिलेने फिर्यादी यांच्या घरातून 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व रोख रक्कम असा एकूण तीन लाखांचा माल चोरून नेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare