गौतम गंभीर याचे क्रिकेट करिअर मी संपवले- मोहम्मज इरफान

219

कराची, दि. ७ (पीसीबी) – ‘भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याचे क्रिकेट करिअर मी संपवले आहे. २०१२ च्या मालिकेत गंभीरला माझा चेंडू खेळताच येत नव्हता. तिथूनच त्याच्या करिअरला उतरती कळा लागली,’ असा दावा पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद इरफान याने केला आहे.

२०१२ मध्ये भारत व पाकिस्तानमध्ये टी-२० व एकदिवसीय मालिका झाली होती. या मालिकेत मोहम्मद इरफान यानं गंभीरला तब्बल चारवेळा बाद केले होते. या मालिकेनंतर गंभीरला भारताकडून केवळ एकच मालिका (इंग्लंडविरुद्ध) खेळता आली. त्यानंतर त्याला संघात पुन्हा कधीच संधी मिळाली नाही. त्याकडे इरफानने लक्ष वेधले आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इरफान म्हणाला, ‘२०१२ साली झालेल्या मालिकेत गंभीर माझ्या गोलंदाजीचा सामना करताना चाचपडत होता. माझ्या उंचीमुळे भारतीय फलंदाजांना त्याच्या चेंडूचा अंदाज यायचा नाही. चेंडू किती वेगाने येईल हेही त्यांना कळत नव्हते. विराटसह भारतीय संघातील काही फलंदाजांनी स्वत: मला तसे सांगितले होते. गंभीरला तर माझी गोलंदाजी नकोशी वाटायची. तो माझ्याशी नजरही मिळवू शकत नव्हता. तो मला टाळायचा,’ असेही इरफान मुलाखतीत म्हणाला.

WhatsAppShare