नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) – भारताचा डावखुरा फलंदाज गौतम गंभीर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून सध्या लांब आहे. मात्र, गंभीर आपली नवीन इनिंग राजकीय पीचवरून सुरु करण्याच्या विचारात आहे. तो भाजपमध्ये प्रवेश करून आगामी दिल्ली विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिल्ली भाजप गौतम गंभीरला उमेदवारी देण्यासाठी इच्छुक आहे, असेही बोलले जात आहे.