गोविंदांना मुलगी आणून देण्याचे विधान करणाऱ्या राम कदमांवर आव्हाडांची टीका

65

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – घाटकोपर येथे भाजपचे आमदार राम कदम यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवामध्ये गोविंदांशी संवाद साधताना त्यांनी महिलांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप राष्ट्रवादी क्राँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. कदम यांनी गोविंदाना तुम्हाला पसंत असलेली मुलगी पळवून आणून तुम्हाला देणार, असे विधान केल्याचा एक व्हिडीओ आव्हाड यांनी ट्विट केला आहे.