गोवंडीत महापालिकेच्या शाळेतील ७७ विद्यार्थ्यांना विषबाधा; एका विद्यार्थिनीचा मृत्यू

164

मुंबई, दि. १० (पीसीबी) – महापालिकेच्या आरोग्य केंद्रातून दिल्या जाणाऱ्या औषधांतून विषबाधा होऊन गोवंडीतील एका महापालिका शाळेतील ७७ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. त्यातील एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. ही घटना गोवंडीच्या संजय नगर येथील उर्दू माध्यमाच्या शाळेत घडली.

चाँदणी साहिल शेख (वय १२) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. तर, इतर विद्यार्थ्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी गोवंडीच्या संजय नगर येथील उर्दू माध्यमाच्या शाळेत महापालिकेच्या आरोग्य केंद्रातून दिल्या जाणाऱ्या कॅल्शियम आणि रक्तवाढीची औषध  विद्यार्थिनी घेतली होती. यामुळे काही विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागला. यामुळे सर्वांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.  दरम्यान मृत विद्यार्थिनी चाँदणी हिला टीबी होता, असेही बोलले जात आहे. पोलिसांनी आणि महापालिका प्रशासनाने चौकशी सुरु केली आहे.