गोयल गंगा फाऊंडेशनच्या वतीने वाहतूक पोलिसांना रेनकोटचे वाटप

113

पुणे, दि. १६ (पीसीबी) – ऊन, पाऊस, थंडीची तमा न बाळगता दिवस रात्र वाहतुकीचे नियोजन, व्यवस्थापन करणारे आणि नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी तत्पर असलेल्या पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच्या उद्देशाने गोयल गंगा फाऊंडेशनच्या वतीने स्वारगेट वाहतूक विभाग आणि मार्केटयार्ड पोलिस स्टेशन यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले.

यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल नवगिरे (वाहतूक विभाग) यांच्यासह इतर मान्यवर व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. यातच वाढणारा पाऊस आणि नियमांचे उल्लंघन करणारे वाहनचालक अशा अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते. तरीही अशा प्रतिकूल परिस्थितीत  वाहतूक सुरक्षित ठेवण्यासाठी ते नेहमी रस्त्यावर सज्ज असतात. यासाठीच पावसाळ्यात वाहतूक पोलिसांची गैरसोय होऊ नये म्हणून गोयल गंगा फाऊंडेशनच्या वतीने हे वाटप करण्यात आले.