गोमांस घेऊन जाणारे चार टेम्पो पडकले; 24 टन गोमांस जप्त

1

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – पशु कल्याण अधिकारी, गोसेवक आणि पोलिसांनी मावळ परिसरात दोन ठिकाणी गोमांस वाहून नेणारे चार टेम्पो पकडले. त्यामध्ये तब्बल 24 टन गोमांस वाहून नेले जात होते. हे सर्व गोमांस उस्मानाबाद येथून मुंबईकडे नेले जात होते. ही कारवाई आज (रविवारी) पहाटे करण्यात उर्से टोलनाका आणि तळेगाव दाभाडे शहराजवळ या दोन ठिकाणी करण्यात आली.

एका प्रकरणात शिरगाव परंदवडी पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुस-या प्रकरणात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून गोमांस वाहून नेले जाणार असल्याची माहिती गोसेवकांना मिळाली. त्यानुसार पोलिसांना याची माहिती देऊन सर्वांनी उर्से टोल नाक्यावर सापळा लावला. त्यामध्ये तीन आयशर टेम्पो ताब्यात घेण्यात आले.

तिन्ही टेम्पोमध्ये 18 टन गोमांस वाहून नेले जात होते. ओळखता येऊ नये, यासाठी गोमांसाच्या बाजूने भाजीपाला लावण्यात आला होता. हे गोमांस उस्मानाबाद येथून मुंबईला नेण्यात येत होते.

तर दुसरी कारवाई तळेगाव दाभाडे जवळ करण्यात आली. यामध्ये एक टेम्पो ताब्यात घेण्यात आला आहे. या टेम्पोमध्ये सहा टन गोमांस होते. हे गोमांस देखील उस्मानाबाद येथून मुंबईला नेण्यात येत होते. दोन्ही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकूण 24 टन गोमांस आणि चार टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

WhatsAppShare