गोडाऊनचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला; एवढ्या लाखांचा माल चोरीला

47

चाकण, दि. १९ (पीसीबी) – कंपनीच्या गोडाऊनचा मागील बाजूचा पत्रा उचकटून अज्ञात चोरट्यांनी एक लाख 71 हजार रुपये किमतीचा कच्चामाल चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 16) रात्री 7 ते शनिवारी (दि. 17) सकाळी 9 वाचताच्या कालावधीत ढवळे वस्ती म्हाळुंगे येथे प्रीमियम पोलीअलाईज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या गोडाउन मध्ये घडली.

कारलाल सुरज मलसोनी (वय 33, रा. ढवळे वस्ती, म्हाळुंगे) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढवळे वस्ती म्हाळुंगे येथे प्रीमियम पोलीअलाईज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे गोडाऊन आहे. शुक्रवारी (दि. 16) रात्री 7 ते शनिवारी (दि. 17) सकाळी 9 या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनचा मागील बाजूचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला. गोडाऊन मधून दोन हजार पन्नास किलो वजनाचे प्लास्टिक तीन पी 40 टी एफ ब्लॅकदाना, तीन पी एल ए 990 ब्लॅकदाना, 3 पी जी एफ 30 ब्लॅकदाना असा एक लाख 71 हजार 640 रुपयांचा कच्चामाल चोरून नेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare