गेवराईचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरावर दगडफेक

135

बीड, दि. २५ (पीसीबी) – मराठा मोर्चाच्या आंदोलकांनी बीड जिल्ह्यातील गेवराईचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरावर आणि कार्यालयावर दगडफेक केली आहे. सध्या गेवराई शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज बुधवार सकाळी आंदोलकांनी लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले होते. यावेळी आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आमदार लक्ष्मण पवार घराबाहेर आले. आंदोलकांसोबत चर्चा सुरु होती, मात्र चर्चेनंतर काही जणांनी अचानक लक्ष्मण पवार यांच्या घरावर आणि कार्यालयावर दगडफेक केली. पोलिसांनी या घटनेनंतर तातडीने जमावाला पांगवले आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न केला. शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे.