गॅस सिलिंडर ते बँक शुल्क पर्यंत, १ नोव्हेंबर पासून असे होत आहेत बदल

46

– नियमांबद्दल माहिती घ्या अन्यथा तुमचे मोठे नुकसान

नवी दिल्ली, दि. २९ (पीसीबी) – 1 नोव्हेंबर 2020 पासून देशभरात बरेच नवीन नियम लागू केले जात आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या आयुष्यावर होणार आहे. गॅस सिलिंडर च्या बुकिंगपासून ते बँक शुल्कापर्यंत अनेक नवीन नियमांचा त्यात समावेश आहे. या व्यतिरिक्त भारतीय रेल्वेचे वेळापत्रकदेखील 1 नोव्हेंबरपासून बदलणार आहे, म्हणून 1 तारखेपूर्वी आपल्याला या नियमांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. अन्यथा आपणास मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. काय बदलणार आहे याची माहिती जाणून घ्या.

गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी OTP द्यावा लागेल
एलपीजी सिलिंडर होम डिलिव्हरीची संपूर्ण प्रक्रिया 1 नोव्हेंबरपासून बदलणार आहे. आतापासून गॅस बुकिंगनंतर ग्राहकांच्या मोबाइल क्रमांकावर OTP पाठविला जाईल. जेव्हा सिलिंडर डिलिव्हरीसाठी येतो तेव्हा आपल्याला हा ओटीपी डिलिव्हरी बॉयला द्यावा लागणार आहे. एकदा हा कोड सिस्टमशी जोडला गेल्यानंतर ग्राहकांना सिलिंडरची डिलिव्हरी मिळेल.

नोव्हेंबरपासून BoB ग्राहकांना शुल्क भरावे लागणार
आता बँकांमध्ये पैसे जमा करण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी फी भरावी द्यावी लागणार आहे. BoB नेही याची सुरुवात केली आहे. पुढील महिन्यापासून विहित मर्यादेपेक्षा जास्त बँकिंग सेवेचा वापर केल्यास वेगळी फी आकारली जाणार आहे. 1 नोव्हेंबरपासून ग्राहक कर्ज खात्यातून महिन्यात तीन वेळा पैसे काढू शकतील. त्याहून जास्त वेळा व्यवहार केल्यास दीडशे रुपये द्यावे लागणार आहेत, बचत खात्याविषयी बोलायचे झाल्यास अशा खातेदारांना तीन वेळा पैसे जमा करणे विनामूल्य असेल, परंतु जर ग्राहक चौथ्यांदा पैसे जमा करत असतील तर त्यांना 40 रुपये द्यावे लागतील. त्याच वेळी जन धन खातेदारांना यातून थोडा दिलासा मिळाला आहे, त्यांना जमा करण्यात येणाऱ्या रकमेवर कोणतीही फी भरावी लागणार नाही, परंतु पैसे काढताना 100 रुपये द्यावे लागतील.

WhatsAppShare