राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याला कोरोना संसर्ग; स्वत: ट्वीट करत दिली माहिती

66

मुंबई, दि.२८ (पीसीबी) : देशात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढतोय. अशातच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा कोरोना संसर्ग झाला असून त्यांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिलीये. कोरोनाची लक्ष दुस्तर असल्याने त्यांनी त्यांची कोरोना चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.

आपल्या ट्विटर वरून त्यांनी ट्विट करत म्हंटल आहे कि, “कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्याने मी माझी टेस्ट केली असून माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहे. नागपूर आणि अमरावती दौऱ्यादरम्यान तसेच इतर कार्यक्रमाप्रसंगी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना माझे आवाहन आहे की, त्यांना लक्षणे आढळून आल्यास कोरोना टेस्ट करून घ्यावी. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे”, असं आवाहनही गृहमंत्र्यांनी केली आहे.

WhatsAppShare