गृहनिर्माण क्षेत्राची परिस्थिती सुधारण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेईल

59

मुंबई, दि.११ (पीसीबी) –  बांधकाम व्यवसायावरच अनेक इतर उद्योग अवलंबून आहेत. त्यातून अनेक लोकांना रोजगार मिळत आहे. या गृहनिर्माण क्षेत्राची परिस्थिती सुधारण्यासाठी शासन प्रयत्नशील असून विकासकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल. सह्याद्री अतिथीगृह येथे विकासकांच्या क्रेडाई- नेरेडको संस्थेसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते.

गृहनिर्माण क्षेत्राची परिस्थिती सुधारण्यासाठी शासन प्रयत्नशील असून विकासकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल. विकासकांनी आपल्या समस्या मांडताना त्यावर उपाययोजनाही सुचवाव्यात असे आवाहन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे  यांनी केले.