गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना उमेदवारी देणाऱ्या राजकीय पक्षांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

179

दिल्ली, दि.१३ (पीसीबी) –  विविध गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना उमेदवारी देणाऱ्या राजकीय पक्षांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना उमेदवारी का देण्यात आली, याच गुन्हेगारी पार्श्र्वभूमी असलेल्या नेत्यांसंदर्भात सर्वौच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती या याचिकेवर न्यायालयासमोर गुरूवारी सुनावणी झाली. पक्षाकडून उमेदवारी देण्यात आलेल्या नेत्यांची निवडीची कारणं, महत्त्वाची माहिती आणि गुन्हेगारी पार्श्र्वभूमीवर माहिती पक्षाच्या संकेतस्थळावर प्रसिद्धि करावी . त्याचबरोबर वृत्तपत्रे, फेसबुक, ट्विटर यांसारख्या सोशेल माध्यमातूनही ही माहिती जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत

WhatsAppShare