गुटखा विक्री प्रकरणी तिघांवर गुन्हा; एकास अटक

14

चिखली, दि. 15 (पीसीबी) : शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे. त्याच्यासह गुटखा विक्रीसाठी दुकान उपलब्ध करून देणाऱ्या दोघांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 14) सकाळी रुपीनगर येथे करण्यात आली.

मांगीलाल कुपारामजी सोळंकी (वय 40, रा. रुपीनगर, तळवडे), ओमजी बिष्णोई (वय 45), दिलीप धाड (वय 40, रा. रुपीनगर, तळवडे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार संतोष बर्गे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मांगीलाल याने दिलीप धाड याच्या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या एका दुकानात गुटखा विक्रीचे दुकान सुरू केले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई करत मांगीलाल याला अटक केली. त्याला दुकान उपलब्ध करून दिल्या प्रकरणी ओमजी आणि दिलीप या दोघांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare