गुटखा वाहतूक प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांची कारवाई; 39 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

432

तळेगाव दाभाडे, दि. २१ (पीसीबी) – प्रतिबंधित गुटखा वाहतूक केल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी गुटखा, तंबाखू आणि दोन बोलेरो पिकप असा एकूण 39 लाख 59 हजार 556 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

पोलीस नाईक आकाश भालेराव यांनी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बोलेरो पिकप (एम एच 12 / एस एक्स 2896) चालक आणि कामगार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई सोमवारी (दि. 19) रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथे करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि तंबाखूची वाहतूक सुरू असून तळेगाव दाभाडे येथे वर्णा हॉटेल जवळील एका घराशेजारी मोकळ्या जागी बोलेरो पिकप मधून या गुटख्याची वाहतूक होत आहे. अशी माहिती तळेगाव-दाभाडे पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत विमल पान मसाला, तंबाखू आणि दोन बोलेरो पिकप असा एकूण 39 लाख 59 हजार 556 रुपयांचा ऐवज जप्त केला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.