गुटखा पुरवठादार महिलेवर गुन्हा

45

चाकण, दि. १२ (पीसीबी) – चाकण पोलिसांनी एका गुटखा पुरवठादार महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तिच्याकडून सव्वा लाखाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 11) दुपारी पाच वाजता बिडवस्ती, चाकण येथे करण्यात आली.

संगीता सखाराम चौधरी (वय 42, रा. बिडवस्ती, चाकण) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक बी एन यादव यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला संगीता हिने शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, त्यात सुगंधित तंबाखू, स्वादिष्ट सुपारी, तंबाखू विक्रीसाठी पुरवला. आरोपी महिला गुटखा विक्रेत्यांना गुटखा पुरवत असल्याची माहिती चाकण पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी कारवाई करत आरोपी महिलेच्या ताब्यतून एक लाख 25 हजार 338 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे.