गुजरातमध्ये काँग्रेस विद्यार्थी संघटनेचा विजय; अभाविपला पराभवाचा धक्का  

151

गांधीनगर, दि. २५ (पीसीबी) –  गुजरातच्या  बडोद्यातील महाराजा सयाजीराव विद्यापीठातील   जनरल सेक्रेटरी (जीएस) आणि उपाध्यक्ष (व्हाईस प्रेसिंडेंट) या पदाच्या निवडणुकीत नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया अर्थात एनएसयूआय या काँग्रेसच्या विद्यार्थी संघनटेचा विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भाजपच्या अभाविप  (अखिल भारतीय विद्यार्थी संघटना) तिसऱ्या स्थानावर गेली आहे.

जनरल सेक्रेटरी (जीएस) आणि उपाध्यक्ष (व्हाईस प्रेसिंडेंट) या पदासाठी या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत एकूण १६ हजार विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला  होता.  पंतप्रधान मोदींच्या  मतदारसंघात काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयूआयने मिळवलेला  ऐतिहासिक विजय  महत्त्वपूर्ण मानला जात आहे.  जीएसच्या पदावर एनएसयूआयच्या उमेदवाराने मोठ्या फरकाने विजय मिळवला. तर जीएस आणि व्हीपी या दोन महत्त्वाच्या पदावर एबीव्हीपी चक्क तिसऱ्या स्थानावर फेकली गेली  आहे.

दरम्यान, या निवडणुकीत तरुणाईचा कल भाजपविरोधात दिसून आल्याचे  काँग्रेसने म्हटले आहे.  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातमधील महत्त्वाच्या पदांवर तरुण कार्यकर्त्याना संधी दिली आहे. प्रस्थापितांना डावलून   नव्या आणि तरुण चेहऱ्यांना गुजरातमध्ये पदे देण्यात आली आहेत. यापूर्वी काँग्रेसच्या एनएसयूआयने दिल्ली विद्यापीठातही विजय मिळवला होता.