गुंडास्कॉडने पिंपरीतून एका विधीसंघर्षीत बालकाकडून जप्त केल्या चोरीच्या सहा दुचाक्या

325

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – एका विधीसंघर्षीत बालकाकडून गुंडास्कॉड उत्तर विभागाच्या पोलिसांनी तब्बल २ लाख १० हजार रुपये किमतीच्या सहा चोरीच्या दुचाक्या जप्त केल्या आहेत. ही कारवाई आज (गुरुवार) करण्यात आली.

याप्रकरणी एका विधीसंघर्षीत बालकाला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंडास्कॉड उत्तर विभागाचे पोलिस शिपाई दत्ता फुलसुंदर यांना त्यांच्या खबऱ्या मार्फ खात्रीशीर माहिती मिळाली कि पिंपरीतील शगुनचौकात एक विधीसंघर्षीत बालक चोरीची सुझुकी अॅक्सेस मोपेड दुचाकी विक्री करण्यासाठी येणार आहे. यावर पोलिसांनी सापळा रचून संशयीत विधीसंघर्षीत आरोपीला अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता त्याच्याकडे एकूण सहा दुचाक्या मिळून आल्या. त्यामध्ये  १ सुझुकी अॅक्सीस, १ टिव्हीएस वेगो, १ हिरोहोंडा पॅशन, २ यामाहा एफझेड आणि १ हिरोहोंडा स्प्लेंडर या दुचाक्यांचा समावेश होता. पोलिसांनी या सर्व गाड्या जप्त केल्या असून त्यांची किमंत एकूण २ लाख १० हजार आहे. आरोपीने या दुचाक्या पिंपरी, पुणे कॅम्प, शिवाजीनगर आणि संत तुकारामनगर येथील वायसीएम हॉस्पीटल येथून चोरल्याचे कबुल केले आहे.

ही कारवाई अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) प्रदीप देशपांडे, पोलीस उपआयुक्त शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, पोलीस फौजदार नरेंद्र सोनवणे, भालचंद्र बोरकर, शितल शिंदे, रमेश भिसे, प्रदीप शेलार, दत्ता फुलसंदुर, अतुल मेंगे, नवनाथ चांदणे, कांतिलाल बनसोडे यांच्या पथकाने केली.