गुंडानी तलवारी, कोयते घेऊन वाहनांची केली तोडफोड; आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी काही मिनिटांतच….

1

पिंपरी, दि. 1 (पीसीबी): मोहननगर येथे गुंडानी हातात तलवारी, कोयते घेऊन रात्री साडेबारा च्या सुमारास वाहनांची तोडफोड केली. पिंपरी चिंचवड चे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी काही मिनिटांतच स्वतः घटनास्थळी येऊन कारवाई केली. तासाभरात सर्व गुंडांच्या मुस्क्या आवळल्या. त्यांच्या सोबत अतिरिक्त पोलिस आयुक्त रामणाथ पोकळे, पोलिस उपयुक्त सुधीर हिरेमठ, सह आयुक्त, पोलिस निरिक्षक व मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. मोहननगर, फुलेनगरला पोलिस छावणीचे स्वरुप आले होते. हि कारवाई रात्री तीन वाजेपर्यंत सुरू होती. यामधे स्वतः पोलिस आयुक्त उपस्थित होते.

यापुर्वी नेहरुनगर, थेरगाव, आकुर्डी परिसरात असे प्रकार य अनेकदा झाले. मात्र एवढे गतिमान पोलिस प्रशासन दिसले नाही. गतिमान पोलिस प्रशासन नागरिकांना दिसले. गुन्हेगारीच्या विरोधात हा रात्रीचा हा अनुभव अत्यंत आशादायी आहे.

WhatsAppShare