गुंडांच्या त्रासाला कंटाळून विवाहित महिलेचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न

3730

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – गुंडांच्या त्रासाला कंटाळून एका विवाहित महिलेने अंगावर रॉले ओतून मंत्रालयाच्या गेटसमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज (गुरुवार) दुपारी तीनच्या सुमारास घडली. मात्र वेळेच या महिलेला पोलिसांनी अडवल्याने मोठा अनर्थ टळला.

दिपाली भोसले (रा. समता चाळ, चेंबूर, वाशी नाका) असे या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेंबूर येथील गुंड मोहमद सय्यद अन्सारी आणि त्याच्या इतर तीन साथीदारांकडून आपल्याला त्रास  दिला जात आहे. याविरोधात चेंबूरच्या आरसीएफ पोलीस ठाण्यात तक्रार करूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही. पोलीस आरोपीस पाठीशी घालत आहेत, असा आरोप करत दीपाली खंडू भोसले या महिलेने आज थेट मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर येऊन अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलिसांनी त्यांना अडवल्याने मोठा अनर्थ टळला.