गिरीश महाजनांसारखा मलाही फटका; सेल्फी प्रकरणी एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया   

97

मुंबई, दि. १२ (पीसीबी) –  पूरग्रस्तांच्या मदतीसाठी  जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अहोरात्र मेहनत घेऊन त्या ठिकाणी मदत पोहोचवली.   स्वतः पाण्यात उतरून पूरग्रस्तांना वाचविण्यात पुढाकार घेतला. मात्र महाजन यांनी केलेल्या मदती पेक्षा माध्यमांनी त्यांच्या सेल्फीला प्राधान्य दिले, अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी महाजन यांची पाठराखण केली.

खडसे म्हणाले की,  ‘माध्यमांच्या या टीकेचा आपल्यालाही फटका बसला आहे. आपण केलेल्या चांगल्या कामापेक्षा दाऊदच्या बायकोशी आपले संबंध असल्याचे जास्त पसरविले गेले. माध्यमांनी कोणत्याही वृत्ताची खात्री करूनच ते प्रसिद्ध करावे आणि आपली विश्वासार्हता वाढवावी.

दरम्यान, या सेल्फी प्रकरणावर गिरीश महाजन यांनी  खुलासा करताना म्हटले होते की, अनेक लोक माझ्यासोबत सेल्फी काढतात. मी त्यांना नकार देऊ शकत नाही. सध्या संकटाची स्थिती आहे, लोकांना प्रचंड त्रास होत आहे. मात्र, विरोधकांना फक्त या सगळ्याचे राजकारण करायचे आहे,  असे उत्तर महाजन यांनी दिले होते.