गिफ्ट न आणल्यामुळे पत्नीने पतीला पळून पळून मारले

287

गाझियाबाद, दि.१८ (पीसीबी) – पत्नीसाठी गिफ्ट न आणणे एका पतीला चांगलच महागात पडले आहे. करवा चौथला पत्नीने सोन्याची नथ आणल्याने रागाच्या भरात पतीला पळवून पळवून मारल्याची घटना समोर आली आहे. हि घटना गुरूवारी (१७ आक्टोंबर) सकाळी गाझियाबादमध्ये घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, गाझियाबादमध्ये हे दाम्पत्य राहते. पती गाझियाबादमधील एका खाजगी कंपनीत नोकरी करतो. महिन्याला १३ हजार रूपये कमवतो. करवा चौथच्या निमित्ताने पत्नीने पतीला गिफ्ट म्हणून सोन्याची नथ आणायला सांगितली होती. मात्र पती फक्त नवीन साडी घेऊनच घरी आला. त्यामुळे पत्नी नाराज झाली आणि त्या दोघांमध्ये वाद सुरू झाला. पुढे हा वाद टोकाला गेला. संतापलेल्या पत्नीने काठीने मारायला सुरूवात केली. त्याने तिला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र पत्नीने त्याचे काही ऐकून घेतले नाही. थोड्यावेळाने दोघेही शांत झाल्यानंतर एकमेकांचा तक्रार करण्यासाठी पोलिस स्टेशन पती पत्नी दाखल झाले. पतीकडे पैसे नसल्यामुळे पत्नीने सांगितलेली नथ घेतली नाही. पुढच्या वेळी नक्की घेऊन येईल असं पत्नीला सांगितले. मात्र संतापलेल्या पत्नीने त्याचे काही ऐकून न घेता वाद सरू केला तसेच मारहाण केली. या दाम्पत्याला एक चार वर्षाचा मुलगा आहे. ऐकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या दाम्पत्याची समजूक काढण्यात आली आहे. तसेत आनंदात राहण्याचा सल्ला देऊन घरी परत पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.  

WhatsAppShare