गांधी विचार परीक्षेत अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी प्रथम

331

नागपूर, दि. १३ (पीसीबी) – सहयोग ट्रस्ट, सर्वोदय आश्रम नागपूर आणि मुंबई सर्वोदय मंडळ  यांच्या संयुक्त  विद्यमाने नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी घेण्यात आलेल्या गांधी विचार परीक्षेत  कुख्यात गुन्हेगार अरुण गवळीने सर्वाधिक गुण प्राप्त करत प्रथम क्रमांक पटकावला.

कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदीवानांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी तसेच त्यांच्या आचारविचारात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी गांधी विचार परीक्षा घेतली जाते. अरुण गवळीने ही परीक्षा गंभीरतेने घेऊन त्यात घवघवीत यश संपादन केले. या परीक्षेत सहभागी कैद्यांना पुरस्कार आणि प्रमाणपत्रांचे वितरण नागपूर मध्यवर्ती कारागृहातील प्रार्थना सभागृहात आज रविवारी करण्यात आले.

यावेळी कारागृहाच्या अधीक्षक  राणी भोसले, सहयोग ट्रस्टचे विश्वस्त आणि गांधी विचार परीक्षा नियंत्रक डॉ. रवींद्र भुसारी, ह्य़ूमन राइट्स अँड लॉ डिफेंडर्सच्या समन्वयक अॅड. स्मिता सरोदे-सिंगलकर, वरिष्ठ  तुरुंगाधिकारी आनंद कांदे आणि साप्ताहिक  विदर्भ मिररचे मुख्य संपादक संदेश सिंगलकर उपस्थित होते.