गांजा बाळगल्याप्रकरणी तरुणास अटक; आठ किलो गांजा जप्त

85

खेड, दि. २७ (पीसीबी) – गांजा बाळगल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडून आठ किलो 154 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई खेड तालुक्यातील कुरुळी येथे रविवारी (दि. 25) रात्री करण्यात आली.

तात्या मदन काळे (वय 21, रा. खटाटे वस्ती, सोरतापवाडी, ता. हवेली) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस नाईक अजय गायकवाड यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरूळी गावातील ज्ञानराज मंगल कार्यालयाजवळ एक तरुण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती चाकण पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कारवाई केली. त्यात आरोपी तात्या काळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये आठ किलो 154 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा आणि इतर साहित्य असा एकूण एक लाख 69 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चाकण पोलीस तपास करीत आहेत

WhatsAppShare