गहुंजे येथील मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर कारचा भीषण अपघात

152

देहुरोड, दि. ११ (पीसीबी) – लोखंडी बॅरिकेटला धडकून झालेल्या भीषण अपघातात स्विफ्ट कारचालक गंभीर जखमी झाला. हा अपघात मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील गहुंजे येथे झाला.

मूनशीर आलम (वय ३४, रा. अंधेरी, मुंबई) असे अपघातात जखमी झालेल्या कारचालकाचे नाव आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या व्यक्तिरिक्त गाडीत कोणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. तो पुण्याच्या दिशेने जात असल्याची प्राथमिक माहिती आहे.