गवत काढण्यास थांबविल्याने तिघांना बेदम मारहाण

0
63
fight

हिंजवडी, दि. ०३ (पीसीबी)

सोसायटी लगत असलेले गवत काढत असलेल्यांना थांबविल्याने तिघांना बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवारी (दि. 2) दुपारी तीर्थ टॉवर सुस येथे घडली.

सोमनाथ नागनाथ गुंड (वय 44, रा, सुस) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार यशवंत शंकरराव निम्हण, ऋषिकेश यशवंत निम्हण, अभिषेक यशवंत निम्हण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे तीर्थ टॉवर या सोसायटी लगत असलेले गवत काढत होते. त्यांना ते काम थांबविण्यास सांगितले असता आरोपींनी भरत पासी यांच्या अंगावर जेसीबी घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांना बेदम मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या वासू कुनीचेट्टी यांना देखील बेदम मारहाण केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.