“गद्दारांना पक्षात स्थान नाही, दोन दिवसांत हकालपट्टी करणार”

78

औरंगाबाद,दि.१५(पीसीबी) – गद्दारांना माझ्या पक्षात स्थान नाही, दोन दिवसात गद्दारांना पक्षातून हाकलून देईन, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला आहे. राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

राज ठाकरे म्हणाले, पक्षातील काही गद्दार लोक अत्यंत खोट्या आणि चुकीच्या बातम्या माध्यमांना देत आहेत. माझ्याकडे अशा कार्यकर्त्यांची नावे आली आहेत. अशी लोकं मला पक्षात नको असून येत्या दोन-तीन दिवसांत यांचं काय करायचं याबाबत निर्णय घेईन.

पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना पक्षात कोणतंही स्थान नाही. काही जण मुद्दामहून पक्षाची बदनामी करत आहेत. अशा लोकांची नावं मला कळाली आहेत. त्यामुळे यांच्यावर लवकरच कारवाई करेन, असंही ते म्हणाले आहेत.