गणेशोत्सव शांतता बैठक मंगळवारी होणार आचार्य अत्रे रंगमंदिरात

196

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील यंदाचा गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित व व्यव्यस्थितपणे संपन्न होण्याकरिता पिंपरी चिंचवड महापालिका व पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय यांच्या वतीने मंगळवार (दि. १३) सायंकाळी ५ वाजता संत तुकाराम नगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे व खासदार अमर साबळे यांच्या विशेष उपस्थितीत बैठक होणार असून गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी त्यास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

या बैठकीस खासदार श्रीरंग बारणे, सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, विरोधी पक्षनेते नाना काटे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, उपमहापौर सचिन चिंचवडे, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

तसेच अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, स्मिता पाटील, विनायक धाकणे, यांच्यासह विधी समिती सभापती अश्विनी बोबडे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती तुषार हिंगे, शहर सुधारणा समिती सभापती राजेंद्र लांडगे, महिला वबालकल्याण समिती सभापती निर्मला कुटे, शिक्षण समिती सभापती मनिषा पवार, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, क प्रभाग अध्यक्षा यशोदा बोईनवाड, ड प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम, इ प्रभाग अध्यक्षा सुवर्णा बुर्डे, फ प्रभाग अध्यक्षा योगिता नागरगोजे, ग प्रभाग अध्यक्षा अर्चना बारणे, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, नगरसदस्य योगेश बहल, शाम लांडे, नगरसदस्या सुलक्षणा धर, सुजाता पालांडे, स्वीकृत सदस्य माऊली थोरात यांच्यासह सर्व सन्माननीय नगरसदस्य व नगरसदस्या उपस्थित राहणार आहेत. तसेच महापालिकेतील विविध विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

तरी या बैठकीस शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळ, पदाधिकारी, सामाजिक संस्था, कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक यांनी सहभागी होऊन आपल्या सूचना मांडाव्यात असे आवाहन महापौर राहुल जाधव यांनी केले आहे.