गणेशोत्सव मिरवणुकीतील डॉल्बी, डीजे बंदी कायम; न्यायालयाने निकाल ठेवला राखून

0
1040

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – गणेशोत्सव मिरवणुकीतील डॉल्बी, डीजे बंदीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज (बुधवारी) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र या प्रकरणी न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.

सुनावणी दरम्यान याचिकाकर्ता ‘प्रोफेशनल ऑडिओ अॅण्ड लाइटनिंग असोसिएशन’च्या वकिलांनी लाइव्ह कॉन्सर्ट आणि इनडोअर कार्यक्रमांमध्ये डीजे व डॉल्बीला परवानगी दिली जाते. मग सार्वजनिक ठिकाणीच बंदी का, असा सवाल विचारला. तसेच डीजे आवाजाची मर्यादा ओलांडणार नाही, असे सांगितले. मात्र हायकोर्टाने यावर, कोर्टात दावा केला जातो मात्र प्रत्यक्षात याचे पालन होत नाही हे सर्वांनाच माहिती आहे, असे सुनावले. त्यामुळे या याचिकेवरचा निर्णय उच्च न्यायालयाने राखून ठेवत अद्याप कुठल्याच प्रकारचा दिलासा दिलेला नाही.