गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफी

65

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी चांगली बातमी आहे. मुंबईहून कोकणात जाणाऱ्या नागरिकांकडून टोल न आकारण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या हजारो नागरिकांना याचा लाभ होणार आहे.