गणेशोत्सवात दारू पिल्यास ११ दिवसांची पोलीस कोठडी; गिरीश बापटांचा इशारा   

1544

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – गणेशोत्सवादरम्यान आणि गणेश विसर्जन मिरवणुकीत काही कार्यकर्ते  मद्यपान करून धांगडधिंगाणा घालतात. त्यामुळे  या उत्सवाला गालबोट लागते. मात्र. येथून पुढे याबाबतचे  भान कार्यकर्त्यांनी ठेवले पाहिजे. गणेशोत्सवादरम्यान दारू प्याल तर ११ दिवस पोलिस कोठडी  देण्यात येईल, असा इशारावजा सुचना अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना दिल्या.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने पिंपरी-चिंचवड राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते.

यावेळी बापट म्हणाले की, धार्मिक सण साजरा करताना प्रत्येकाने इतर धर्माचा अनादर होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. पुणे आणि परिसरातील सर्वच गणेश मंडळांनी अनावश्यक खर्च टाळून केरळ पूरग्रस्तांसाठी मदत करावी. गणेशोत्सवात जनजागृतीपर देखावे तयार करून सामाजिक संदेश देतात, त्यांचा मला अभिमान वाटतो. मात्र, विसर्जनावेळी काही  कार्यकर्ते दारू पिऊन धिंगाणा घालतात. त्यामुळे उत्सव आणि  मंडळाच्या प्रतिमेला गालबोट लागते, याचे भान कार्यकर्त्यांनी ठेवले पाहिजे.